Gorkhapur Accident: गोरखपूर-कुशीनगर महामार्गावर अपघात, भरधाव ट्रकचा बसला धडक, 6 ठार
गोरखपूरमध्ये गुरुवारच्या मध्यरात्री कुशीनगर महामार्गावर जगदीपूरजवळ अपघात झाला.
Gorkhapur Accident: गोरखपूरमध्ये गुरुवारच्या मध्यरात्री कुशीनगर महामार्गावर जगदीपूरजवळ अपघात झाला. भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याची घटना घडली आहे. पंक्चर झाल्याने बस रस्त्यावर उभी होती.या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जम जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांनी प्रकृती खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी अपघात स्थळी दाखल झाले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरहून एक खासगी बस प्रवाशांना घेऊन पडरौनाला जात होती. जगदीशपूर येथीळ मल्लापूरजवळ बसचे चाक पंक्चर झाले. ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती. आणि दुसरी बस मागवली. दुसरी रिकामी बस येताच काही जण पटकन बसमध्ये बसले. तर काही जण दोन्ही बसच्या मध्ये उभे होते, दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला मागून जोरदार धडक दिली. याघटनेत बसचा मागील भाग चेंदामेंदा झाला.
या अपघातात सह जण जागीच मृत्यूमुखी पडले. तर अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. अपघात स्थळी पोलिस दाखल होताच, जखमी प्रवाशांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात स्थळी पाच रुग्णवाहिका अपघात स्थळी आली. आणि जखमींना वैद्यकिय महाविद्यालयात नेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये ३० प्रवाशी प्रवास करत होते.