PM Kisan 12th Installment: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! 12 व्या हप्त्याचे पैसे 'या' दिवशी होणार ट्रान्सफर

दिवाळीपूर्वी, मोदी सरकार या आठवड्यात देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करणार आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 व्या हप्त्याअंतर्गत 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील.

PM Kisan 12th Installment: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! 12 व्या हप्त्याचे पैसे 'या' दिवशी होणार ट्रान्सफर
Indian Farmers | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

PM Kisan 12th Installment: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या म्हणजेच पीएम किसानच्या 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दिवाळीपूर्वी, मोदी सरकार या आठवड्यात देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करणार आहे. 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 व्या हप्त्याअंतर्गत 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील.

17 ऑक्टोबर रोजी 11 वाजता खात्यात पैसे येणार -

कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पीएम किसानचा 12 वा हप्ता जारी करतील. 17 ऑक्टोबर रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीच्या फेअर ग्राउंड IARI पुसा येथे पंतप्रधान मोदी 'पीएम किसान संमेलन 2022' ला संबोधित करतील. (हेही वाचा - FD Interest Rate: खुशखबर! SBI ने ग्राहकांना दिलं खास दिवाळी गिफ्ट; FD व्याजदरात केली वाढ)

योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना बाराव्या हप्त्याचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही अद्याप ई-केवायसी केले नसेल, तर पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जा आणि आजच तुमचे ई-केवायसी पूर्ण करा.

तुमचे नाव यादीत आहे की नाही ते तपासा?

  • सर्वप्रथम PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा. होम पेजवर
  • मेनूबारवर जा आणि 'फार्मर कॉर्नर' वर जा.
  • येथे लाभार्थी यादीवर क्लिक/टॅप करा. हे केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल.
  • येथे तुम्ही राज्यातील ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडा.
  • त्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्या टॅबमध्ये तहसील किंवा उपजिल्हा, चौथ्या
  • क्रमांकावर ब्लॉक आणि पाचव्या क्रमांकावर तुमच्या गावाचे नाव निवडा.

यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक करताच संपूर्ण गावाची यादी तुमच्या समोर येईल.

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2022 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).