OYO कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, आता प्रत्येक आठवड्यात मिळणार 3 Weeks Off आणि Infinite Paid Leaves

या उपक्रमांतर्गत कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही दिवशी सुट्टी घेऊ शकतात. त्यांना फक्त त्यांच्या व्यवस्थापकाला याबद्दल माहिती द्यावी लागेल.

OYO कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, आता प्रत्येक आठवड्यात मिळणार 3 Weeks Off आणि Infinite Paid Leaves
OYO (PC- Wikimedia Commons)

आतिथ्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या OYO या कंपनीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आता तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, कंपनी चार दिवसांची कार्य प्रणाली स्वीकारेल. यासह कंपनीने वेगळ्या प्रकारची पेड रजा आणली आहे. या उपक्रमांतर्गत कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही दिवशी सुट्टी घेऊ शकतात. त्यांना फक्त त्यांच्या व्यवस्थापकाला याबद्दल माहिती द्यावी लागेल.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टी घ्या.” कर्मचाऱ्याला लॉग इन करण्याची आवश्यकता नाही. फक्त याविषयी मॅनेजरला माहिती द्या. कोणतेही कारण आवश्यक नाही. कोणतेही कारण विचारले जाणार नाही. आम्ही व्यवसायावर होणाऱ्या परिणाम आणि अंतिम मुदतीवर जोर देणार नाही. आमचा विश्वास आहे की, जर OYO चे कर्मचारी अधिक लक्ष केंद्रित, कार्यक्षम आणि उत्पादक पद्धतीने कार्य करतील तर कामकाजात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.'' (वाचा - खुशखबर! Covid-19 महामारी काळात बँकिंग क्षेत्रातील 'ही' कंपनी देणार 4 हजार भारतीयांना नोकऱ्या)

त्यांनी दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोविड लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करीत आहे. अशा वेळी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रियजनांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे. स्टार्टअप्स आणि इतर मोठ्या कंपन्यांप्रमाणे आम्ही या आठवड्यात काही पुढाकार घेतले आहेत.

अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, “आजपासून आम्ही चार दिवसांचे कामकाज सप्ताह राबवित आहोत. पण ते थोडे वेगळे असेल. त्याअंतर्गत बुधवारी ऑफ देण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या मध्यभागी एका दिवसाचा विश्रांती मिळेल. आम्ही 'No Questions Asked Flexible Infinite Paid Leaves' चा देखील प्रारंभ केला आहे. OYO चे 80 देशांमध्ये 800 शहरांमध्ये एक लाखापेक्षा जास्त हॉटेल्स आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 14, 2021 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).