Today Gold-Silver Price: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,290 रुपये आणि चांदीचा दर 60,600 रुपये प्रति किलो आहे.

Gold & Sliver Rate | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गेल्या दोन दिवसांपासून सोन्या -चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price) घट होत आहे. या सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्याने लोकांना दिलासा मिळत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, जेथे सोने आज 438 रुपयांनी स्वस्त झाले आणि सराफा बाजारात 46256 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले. तर चांदी 113 रुपयांनी घसरून 60675 रुपये झाली. त्याच वेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा वायदा भाव MCX वर सोन्याची किंमत 46070 आणि चांदीचा वायदा भाव 60630 झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात. देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक लावला होता.

दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,740 रुपये आणि चांदीचा दर 60,600 रुपये प्रति किलो आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,290 रुपये आणि चांदीचा दर 60,600 रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 43,570 रुपये आणि चांदीचा दर 64,900 रुपये किलो आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,890 रुपये आणि चांदीची किंमत 60,600 रुपये प्रति किलो आहे. हेही वाचा सामान्य नागरिकांची चिंता वाढली, 'या' कारणामुळे महाग होऊ शकते पेट्रोल-डिझेल

गुरुवारी सोन्याचा भाव 0.75 टक्के किंवा 349 रुपयांनी घसरून 46,439 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, चांदीची किंमत 60,616 रुपये प्रति किलोवर दिसून आली आणि 1.07 टक्के किंवा 656 रुपयांनी घसरली. 23 सप्टेंबर 2021 रोजी बाजार बंद झाल्यावर सोने आणि चांदीची किंमत अनुक्रमे 46,075 आणि 60,789 रुपये होती.मागील सत्रात 1 टक्क्यांपेक्षा अधिक घसरल्यानंतर शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आघाडीवर सोन्याचे भाव वाढले. डॉलर निर्देशांक गुरुवारी एका आठवड्याच्या नीचांकावर स्थिर राहिला आणि इतर चलनांच्या धारकांसाठी सोने स्वस्त झाले, असे अहवालात म्हटले आहे.

कोटक सिक्युरिटीजने सांगितले की, अमेरिकन डॉलर आणि इक्विटी मार्केटमधील ट्रेंडमुळे सोन्याच्या स्थितीत बदल होऊ शकतो. फेडचे आर्थिक धोरण आणि चीनमधील आर्थिक परिस्थितीचे गुंतवणूकदार मूल्यांकन करत आहेत. तुम्ही घरी बसून हे दर सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट दर तपासू शकता.