Gold Rates Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 45 हजारांपेक्षा कमी झाले दर
आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे किंमतीत (Gold Rates Today) मोठी घसरण झाली आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे किंमतीत (Gold Rates Today) मोठी घसरण झाली आहेत. भारतीय बाजारात आज सोन्याचे दर 45 हजारांहून कमी झाले आहेत. तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सोन्याचा दर 0.1 टक्क्याने कमी झाले आहेत. ज्यामुळे प्रति तोळा सोने खरेदी करण्यासाठी 44 हजार 981 रुपये मोजावे लागणार आहेत. याचबरोबर चांदीच्या किंमतीतही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचे भाव प्रति किलोग्रॅम 66 हजार 562 रुपये इतका झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर उतरले आहेत. अमेरिकेत सोन्याचे दर 5.07 डॉलरने घसरण झाली आहे. यानंतर या घसरणीनंतर सोन्याचे दर 1 हजार 740.26 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात 0.50 डॉलरच्या घसरणीनंतर दर 25.74 डॉलरच्या स्तरावर पोहोचले आहेत. मुंबईत सध्या 24 कॅरेटचे सोने खरेदी करण्यासाठी 44 हजार 910 रुपये द्यावे लागत आहेत. तर, दिल्लीत 46 हजार 340, चेन्नईत 46 हजार 340 आणि कोलकाता 47 हजार 210 रुपये आहेत. हे देखील वाचा- Pan Aadhaar Linking: 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा, अन्यथा भरावा लागू शकतो 10,000 रुपयांचा दंड
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.