Today Gold-Silver Price: देशात पुन्हा एकदा सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपयांनी वाढले दर ?
आज मार्केटमध्ये 24 कॅरेट सोने 47,547 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोने 43,553 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे.
आज पुन्हा एकदा देशात सोने आणि चांदीचे दर (Gold-Silver Price) वाढले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये आज सोन्याची किंमत 0.33 टक्क्यांनी वाढून 47,320 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. त्याच वेळी, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, स्पॉट मार्केटमध्ये 24 कॅरेट सोने 47,547 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे, तर 22 कॅरेट सोने 43,553 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकले जात आहे. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत 0.35 टक्के वाढ दिसून आली आहे. आज देशात चांदी 63,776 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. काल बाजार बंद झाल्यामुळे सोन्याचा दर 47,164 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा दर 63,587 रुपये प्रति किलो होता.
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2021 01:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

