Goa News: भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी पोलिस कोठडीत

गोव्यातील सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीन तरुणीचा वियनभंग केल्याप्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केले आहे.

Arrest (PC -Pixabay)

Goa News: भररस्त्यात अल्पवयीन मुलीची विनयभंग केल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी माहिती दिली की, पीडित मुलीच्या वडिलांनी शनिवारी पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल केली होती की, एका अज्ञात पुरुषाने अल्पवयीन मुलीला उघड्या सार्वजनिक ठिकाणी अयोग्यरित्या स्पर्श केला आणि आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी मूळचा राजस्थानचा आहे

“आरोपी व्यक्तीचे नाव माजीद खान (20) असे असून तो गोव्यातील बारदेझचा असून तो मूळचा राजस्थानचा आहे. त्याला रविवारी अटक करण्यात आली,” पोलिसांनी सांगितले. आरोपीची ओळख पटविण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली असून त्यानुसार विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केल्यानंतर ते त्याला पकडू शकतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी पीडीत तरुणीच्या वडीलांनी केली आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात येईल असा दावा पोलीसांनी केला आहे, या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला पोलीसांनी अटक केले आहे. अशी माहिती मिळली आहे.