IPL Auction 2025 Live

Glacier Breaks in Uttarakhand: उत्तराखंडमधील जोशी मठाजवळील हिमकडा कोसळला, धरण फुटल्याने धौलीगंगेच्या पाणीपातळी वाढ; पहा व्हिडिओ

अद्याप कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. परंतु, प्रशासनाने या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Glacier Breaks in Uttarakhand (फोटो क्रेडिट्स: ANI)

Glacier Breaks in Uttarakhand: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील (Chamoli District) ऋषीगंगा नदीवरील वीज प्रकल्पाच्या धरणाचा काही भाग तुटल्याची घटना घडली आहे. यामुळे धौलीगंगा नदी प्रवाह वाढला आहे. या घटनेची माहिती मिळताचं जिल्हा प्रशासन व पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेनंतर ऋषिकेश, हरिद्वार यांच्यासह मैदानी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या प्रवाहाने धौलीगंगा नदीचा प्रवाह अनपेक्षितपणे वाढला आहे. अद्याप कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. परंतु, प्रशासनाने या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. जोशीमठ परिसरात ऋषीगंगा नदीवर खासगी कंपनीचा वीज प्रकल्प आहे, जिथे सुमारे 24 मेगावॅट वीज उत्पादन होते. (वाचा - IRCTC Gift For Pilgrims: 'या' धार्मिक स्थळांना भेट देण झालं सोयीस्कर; IRCTC यात्रेकरूंसाठी चालवणार 4 स्पेशन ट्रेन)

दरम्यान, हिमकड्याचा एक भाग कोसळून धरणावर पडला. यामुळे धरणाच्या काही भागाला तडाखा गेला असून धौलीगंगा नदीच्या प्रवाहात वाढ प्रचंड वाढ झाली. या घटनेमुळे धरणाचे पाणी वेगाने अलकनंदा नदीत जात आहे. अलकनंदा नदीचा प्रवाह वाढत असताना केंद्रीय जल आयोगाने संबंधित परिसरात अलर्ट जारी केला आहे.

हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. सोशल मीडियावर हिमकडा कोसळतानाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. यात हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर बरेच लोक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. चामोली ते हरिद्वार पर्यंत वाढत्या धोक्याची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस व एसडीआरएफच्या पथकांनी नदीकाठ परिसर मोकळा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

चमोली जिल्हा प्रशानानुसार, हिमकडा कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याती शक्यता आहे. या घटनेनंतर पोलिस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी आपत्ती सचिव आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून संबंधित घटनेची माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री घटनेचे हवाई सर्वेक्षण करण्यासह चमोली जिल्ह्यातील सर्व अधिकाख्यांची तातडीची बैठक बोलवू शकतात.