Delhi Murder: मैत्रीला विरोध केला म्हणून 16 वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या, एकास अटक

ही घटना सोमवारी दुपारी घडली असून पीडित मुलीचा उपचारादरम्यान आज मृत्यू (Murder) झाला आहे.

प्रतिकात्मक फोटो | Image only representative purpose (Photo credit: File)

दिल्लीच्या (Delhi) मोतीबाग (Moti Bagh) येथे एका तरूणाने 16 वर्षाच्या मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून पीडित मुलीचा उपचारादरम्यान आज मृत्यू (Murder) झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बरेच दिवस मृत मुलीचा पाठलाग करत होता. यामुळे मुलीच्या वडिलांनी त्याला कानशिलात लगावली होती. याचाच राग मनात धरून आरोपीने मुलीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

मोतीबागमध्ये कुऱ्हाडीने 16 वर्षाच्या मुलीची हत्या केलेल्या 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. "आरोपी मुलाला मुलीशी मैत्री करायची होती, पण मुलीने मान्य केल्याने तिची हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी मुलाला मारहाण केली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. हे देखील वाचा- Bhopal: अंडरगार्मेंट्सची चोरी केली म्हणून दाम्पत्याने 17 वर्षांच्या मुलाला खोलीत डांबले; युवकाने केली आत्महत्या, गुन्हा दाखल

ट्वीट-

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच दिल्ली येथील मोतीबाग येथे घडलेल्या घटनेने एकच खळबळ माजली आहे.