झाडावर पाहिले तरुणीचे भूत ; गावकऱ्यांची उडाली झोप

त्यामुळे गावकऱ्यांची या भीतीमुळे त्यांची झोपच उडाली आहे.

फोटो सौजन्य - गुगल

गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील एका गावात तरुणीचे भूत  फिरत असल्याची अफवा वाऱ्यासारखी परसली. त्यामुळे गावकऱ्यांची या भीतीमुळे त्यांची झोपच उडाली आहे. तसेच काही गावकऱ्यांनी या तरुणीचे भूत पाहिले असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरात- राजस्थानच्या सीमेवर गोटा गाव येथील जंगलात तरुणीचे भूत आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले. तर गावातील लोक या घटनेमुळे स्वत:हून भूताच्या वेगवेगळ्या कथा बनवून सांगत आहेत. तसेच झाडावरुन विचित्र पद्धतीचे आवाज येत असल्याचेही गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या घटनेमुळे तेथील स्थानिक पोलिसांनी 11 ऑक्टोंबर रोजी या घटनेचा खुलासा करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी शिकारवेरी या गावातून हरवलेल्या 18 वर्षीय तरुणीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने हरविलेली मुलगी तिच आहे का? हे पाहण्यास पोलिसांना सांगितले. गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गावातील जंगलात त्या मुलीची शोधा शोध सुरु केली. तेव्हा झाडावर भूत म्हणून वावर करत असलेली मुलगी ही हरवलेली मुलगी असल्याची ओळख पोलिसांना पटली. त्यानुसार या मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.

या घटनेतील हरविलेल्या मुलीची चौकशी केली असता, ती मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. तसेच गावात भूत असल्याची अफवा खोटी असल्याचे पोलिसांनी गावकऱ्यांना सांगण्यात आले आहे.



संबंधित बातम्या