Ghaziabad Serial Killer: एका पाठोपाठ कुटुंबातील 5 जणांना संपवले, 20 वर्षानंतर सिरिअल किलरचे बिंग फुटले; गाजियाबाद येथील खळबळजनक घटना
चित्रपटात सिरिअल किलर एका पाठोपाठ हत्या करतात. तसेच आपल्या गुन्ह्याची कुणालाही माहिती होऊ नये, यासाठी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात.
आपण क्राईम किंवा एडव्हेंचर चित्रपटात सिरियल किलर (Serial Killer) पाहिले असतील. चित्रपटात सिरिअल किलर एका पाठोपाठ हत्या करतात. तसेच आपल्या गुन्ह्याची कुणालाही माहिती होऊ नये, यासाठी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात. उत्तर प्रेदशच्या (Uttar Pradesh) गाजियाबाद (Ghaziabad) येथूनही अशीच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, एका व्यक्तीने आपल्याच कुटुंबातील 5 जणांची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 20 वर्षानंतर या घटनेचा तपास लागला आहे. आरोपीने पाच जणांपैकी दोघांची सुपारी देऊन हत्या केली. तर, तीन जणांना त्याने स्वत: ठार केल्याची कबूली दिली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गाजियाबादमध्ये एकच खळबळ माजली आहे.
लीलू त्यागी असे आरोपीचे नाव आहे. लीलू हा गाजियाबाद येथील मुरादनगरच्या बसंतपूर सैंथली येथील राहणारा आहे. आरोपीने गेल्या 20 वर्षात त्याच्याच कुटुंबियातील 5 जणांची एका पाठोपाठ हत्या केली आहे. परंतु, पाचव्या हत्येच्या तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीचे सत्य उघड झाले आहे. हे देखील वाचा- Rajasthan: धक्कादायक! 22 वर्षीय पुतण्याला काका-काकीने कैदेत ठेवून केली मारहाण; जबरदस्तीने पाजले मूत्र
इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 2001 मध्ये प्रथम आपल्या मोठ्या भावाची सुपारी देऊन त्याला ठार केले होते. त्यानंतर त्याचे मृतदेह नदीत फेकून दिले. तसेच त्याने कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, त्याचा भाऊ रागाच्या भरात कुठेतरी निघून गेला. त्यानंतर 2006 मध्ये त्याने आपल्या पुतणीच्या अन्नात विष मिसवून तिची हत्या केली. त्यावेळी तिला विषारी किटक चावल्याचे सांगत आरोपीने आपल्या गुन्ह्यावर पांघरून घातले. त्यानंतर 2009 तिसरी हत्या केली आणि 2013 मध्ये आणखी एका पुतण्याला ठार केले. दरम्यान, आरोपीने 8 ऑगस्ट रोजी आणखी एका पुतण्याची हत्या करून त्याचे मृतदेह बुलंदशहरच्या गंगनगरमध्ये फेकून दिला आणि तो कर्वांना मोठा धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मोठ्या भावाच्या हत्या केली. त्यानंतर त्याच्याच पत्नीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा झाला. तसेच आपल्या मुलाला सर्व संपत्ती मिळावी म्हणून आरोपीने एका पाठोपाठ कुटुंबातील 5 जणांची हत्या केल्याची कबूली दिली आहे.