Ghaziabad Court Room: भर कोर्टात न्यायाधीश आणि वकीलांमध्ये राडा; पोलिसाचा लाठीचार्ज, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल (See Pics and Video)
बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित एका प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांना वकिलांनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर जिल्हा न्यायाधीशांच्या मागणीवर पोलिसांनीही बळाचा वापर केला. ज्यामध्ये अनेक वकील जखमी झाल्याचे समोर येत आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
Ghaziabad Court Room: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वकील आणि न्यायाधीश (Court Clash) यांच्यात वादावादी झाली आणि नंतर प्रकरण पोलिसांच्या लाठीचार्जपर्यंत पोहोचले. पोलिसांनी कोर्ट रूममध्ये वकिलांवर लाठीमार (Lawyers Police Clash)केला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. वकील आणि न्यायाधीश यांच्यात काही मुद्द्यावरून वाद झाला आणि नंतर प्रकरण चिघळले, असे सांगण्यात येत आहे. यात काहीजण जखमीही झाले. (हेही वाचा:Medical Equipment आयातीवर प्रतिबंध लावा, वैद्यकीय उपकरण उद्योगाची केंद्र सरकारला विनंती )
मिळालेल्या माहितीनुसार, नाहरसिंग यादव वकील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित एका प्रकरणावर वाद घातला. वादावादीनंतर या प्रकरणाचे रुपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या लाठीचार्जमध्ये अधिवक्ता नाहर सिंह यादव आणि आणखी एक वकील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर न्यायालयातील कामकाज ठप्प झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गाझियाबादच्या जिल्हा न्यायालयात अनेक पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात करण्यात आले असून न्यायाधीशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
भर कोर्टात न्यायाधीश आणि वकीलांमध्ये राडा
वाद इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी पोलीस आणि पीएसी बोलावल्यानंतर वकिलांवर लाठीचार्ज करण्यात आला. जिल्हा न्यायाधीश न्यायालयाच्या दालनात पोलिसांनी चारही बाजूंनी दरवाजा बंद करून मारहाण केल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. लाठीचार्ज केल्यानंतर वकील चांगलेच संतापले असून त्यांनी पोलीस चौकीची तोडफोडही केली. एकीकडे वकील संपावर बसले आहेत तर दुसरीकडे न्यायाधीशांनीही काम बंद केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)