Rajastan Gang Rape: नोकरी देण्याच्या बहाणे 20 महिलांवर सामुहिक बलात्कार, राजस्थानमध्ये खळबळ

नोकरी देण्याच्या बहाण्याने १५ ते २० महिलांवर सामुहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

Rape case representaional photo

Rajastan Gang Rape: राजस्थान येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने १५ ते २० महिलांवर सामुहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरु केली असून आठ एफआयआर दाखल केल्या आहेत. आरोपींनी पीडित महिलांवर बलात्कार करून त्यांना धमकी देखील दिली होती. धक्कादायक म्हणजे पीडितांचा अश्लिल व्हिडिओ शुट केला आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. (हेही वाचा- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोघांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सिरोही येथील नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि आयुक्तांनी त्यांच्या आठ ते दहा साथीदारांसोबत बलात्कार केल्याचं आरोप आहे. पीडितांनी सिरोही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले.  तक्रारात म्हटलं आहे की, महिलांना अंगणेवाडीत नोकरी देण्याचे दावा करत होते. नोकरीसाठी बोलावून त्यांचे शोषण केले जात होते. त्यांना धमक्याही दिल्या जात होत्या. त्यांचे अश्लिल व्हिडिओ देखील शुट केले आहे. पोलिसांना जर सांगाल तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिली होती. महिलांना कंटाळून पोलिसांत तक्रार केली.

पोलिस या घटनेची वेगाने तपास करत आहे.  या घटनेत उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापती महेंद्र मेवाडा, आयुक्त महेंद्र चौधरी आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांनी पुढे तक्रारीत सांगितले की,  एका ठिकाणी बोलावून महिलांना जेवणाची व्यवस्था करून ठेवायचे. जेवणात आमली पदार्थ किंवा गुंगीचे औषध असल्याने महिला बेशुध्द व्हायाचा. आणि त्याच्यावर बलात्कार करण्यात आला. जाग आल्याव समजले की त्यावर बलात्कार झाल्याचे समजले. ते व्हिडिओ शुट करायचे त्यानंतर धमकी देऊन सोडून द्यायचे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif