Galwan Valley: 1962 मध्ये सुद्धा गलवान व्हॅली भागात चीन ने भारताला दिला होता धोका, आज झाली पुनरावृत्ती, वाचा सविस्तर

यापूर्वी सुद्धा या भागात चीन कडून भारताला धोका देण्यात आला होता असा इतिहास आहे. या घटनेची आज पुनरावृत्ती झाली आहे.

Indian And Chinese Soldiers (Photo Credits: PTI)

India- China Dispute: भारत- चीन संबंध मागील काही दिवसात बिघडलेले असताना आता लडाख प्रांतातील गलवान व्हॅली (Galwan Valley) भागातून मोठी माहिती समोर आली होती. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये काल (15 जून) रात्री De-escalation झाले ज्यात भारताचे 1 लष्करी अधिकारी आणि 2 जवान शहीद झाले आहेत.भारताच्या प्रमाणेच चीन सैनिकांचेही नुकसान झाल्याची माहिती आर्मीकडून देण्यात आली आहे. सध्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) , केंद्रीय मंंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh), तिन्ही लष्कर प्रमुख यांच्यामध्ये बैठक झाली आहे. दरम्यान, गलवान व्हॅली हा भाग 1962 नंतर आज तब्बल 58 वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी सुद्धा या भागात चीन कडून भारताला धोका देण्यात आला होता असा इतिहास आहे. या घटनेची आज पुनरावृत्ती झाली असताना या दोन्ही प्रसंगांविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख आवर्जून वाचा.

लडाख मध्ये गलवान ही एक नदी आहे, या नदीच्या नावावरूनच या घाट परिसराला गलवान व्हॅली असे नाव देण्यात आले आहे. मागील कित्येक वर्षांपासून या नदीच्या किनारे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे तंबू ठोकलेले आहेत. मुळातच हा भाग लडाख म्हणजेच भारताच्याअख्तियारीत येत असल्याने चीन च्या आर्मीला भारतीय सैन्याकडून वारंवार विरोध करत त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला जातो.याच कारणातून अनेकदा दोन्ही गटात चकमक सुद्धा झाली आहे. अशीच चकमक 1962 मध्ये सुद्धा घडली होती.

दुसरीकडे आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्याचे समजत आहे. गलवान घाटीमध्ये मोठ्या संख्येमध्ये टेंट लावण्यात आले होते. 6 जून दिवशी भारत- चीन सैन्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर सैन्य मागे घेण्यास सुरूवात झाली. भारतीय सैन्य दलाचं नेतृत्त्व लेह मध्ये 14 कॉर्प चे कमांडर लेफ्टिनेंट जनरल हरिंदर सिंह करत होते तर चीन कडून कमांडर मेजर जनरल लियू लिन सहभागी होते. पैंगोंग झील च्या उत्तर तटवर फिंगर फोर, गालवान घाटी भागात सैन्य पुढे आले होते. यामध्ये गश्त बिंदु 14, गश्त बिंदु 15 आणि गश्त बिंदु 17-ए सहभागी होते. या दरम्यान झटपट झाल्याने भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले आहे.