Petrol Diesel Price: आज पासून पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, नागरिकांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरात किती दर?
देशात निवडणूकीपूर्वी मोदी सरकारनं पेट्रोल -डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Petrol Diesel Price: देशात निवडणूकीपूर्वी मोदी सरकारनं पेट्रोल -डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची घसरण झाली आहे. आजपासून हे दर लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पूरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. पेट्रोल डिझेलचे नवीन दर हे सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक आहेत. दरम्यान, नवीन दर लागू झाल्यापासून कोणत्या शहरात, किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार हे पाहा-
आज सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंपावर हा नवीन दर लागू झाला आहे. मुंबईत 6 वाजेपासून पेट्रोलचा नवीन दर 104.15 प्रति लीटर तर डिझेलचा दर 92.10 प्रति लीटर झाला आहे. कोलकाता पेट्रोल 103.94 प्रतिलीटर आहे तर 90.76 प्रतिलीटर डिसेल आहे. नवी दिल्लीत 94.72 प्रती लीटर पेट्रोल तर 83.62 प्रती लीटर डिझेल आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यापासून देशभरात आज पासून नवीन दर लागू झाले आहे.हेही वाचा- महाराष्ट्रात 31 मे दिवशी पेट्रोल पंप डीलर्सचा संप; 'या' मागणीसाठी आक्रमक
हरदीप सिंह पूरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सिध्द केले की, आपल्या कोट्यवधी भारतीयांच्या कुटुंबाचे कल्याण आणि सुविधा हे त्यांचे नेहमीचे ध्येय आहे. दरम्यान मोदी सरकारने 8 मार्च रोजी एलपीजी गॅस 100 रुपयांनी स्वस्त केला होता. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.