Wheat Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका! जूनपासूनपासून गव्हाचे पीठ, ब्रेड, बिस्किटांसह 'हे' पदार्थ महागणार

महागाईचा प्रभाव गव्हाच्या किमतीवर जबरदस्त दिसत आहे. गव्हाचे दर सातत्याने वाढत आहेत. 2022 मध्ये या वर्षी आतापर्यंत गव्हाच्या किमती 46 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या बाजारात गहू एमएसपीपेक्षा 20 टक्के जास्त दराने विकला जात आहे.

Wheat, Bread, Biscuits (PC-Pixabay)

Wheat Price Hike: सर्वसामान्य नागरिकांसाठी एक वाईट बातमी आहे. पुढील महिन्यापासून सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. एकीकडे एलपीजी सिलिंडर, स्वयंपाकाच्या तेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या असतानाचं आता मैदा, ब्रेड, बिस्किटे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पदार्थांच्या किमतीही वाढणार आहेत.

महागाईचा प्रभाव गव्हाच्या किमतीवर जबरदस्त दिसत आहे. गव्हाचे दर सातत्याने वाढत आहेत. 2022 मध्ये या वर्षी आतापर्यंत गव्हाच्या किमती 46 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या बाजारात गहू एमएसपीपेक्षा 20 टक्के जास्त दराने विकला जात आहे. अशा स्थितीत गव्हाच्या किमतीमुळे ब्रेड, बिस्किटे, मैदा, गव्हाच्या पिठाच्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. (हेही वाचा - Central Government Cuts Wheat Quota Under PMGKAY: जूनपासून शिधापत्रिकाधारकांना मिळणार कमी गहू; आणखी काय परिणाम होणार? वाचा सविस्तर)

भारतीय अन्न महामंडळ (FCI) पुरवठा वाढवण्यासाठी आणि बाजारात अन्नधान्य, विशेषत: गहू, मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी OMS योजनेअंतर्गत नियमितपणे गव्हाची विक्री करते. ज्या हंगामात गव्हाची आवक कमी असते त्या हंगामात ही विक्री सुरू असते. एफसीआयच्या या कारवाईमुळे बाजारात गव्हाचा पुरवठा सुरू राहून भावही नियंत्रणात आहेत. एफसीआयकडून वर्षभरात सात ते आठ दशलक्ष टन गहू मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. तथापि, केंद्राने चालू वर्षात गव्हासाठी खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) जाहीर केली नाही, ज्यामुळे कंपन्यांना महागाई आणि टंचाईची चिंता आहे.

गव्हाच्या किंमतीत जूनपासून होणार वाढ -

किंमतींचा प्रभाव जूनपासून जाणवू शकतो. कारण मे महिन्याच्या बॅचमध्ये गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. एफसीआय गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त रकमेवर गव्हावर सूट देत आहे. मालवाहतूक अनुदानाचाही फायदा कंपन्यांना झाला आहे. गेल्या वर्षी 2021-22 मध्ये, भारतीय गहू प्रक्रिया उद्योगाने सरकारकडून सुमारे 7 दशलक्ष टन गहू खरेदी केला होता. OMSS वर सरकारकडून आतापर्यंत कोणतीही घोषणा न झाल्याने, कंपन्यांना त्यांचा सर्व गहू खुल्या बाजारातून विकत घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. त्यामुळे कंपन्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now