Pulwama Attack 4th Anniversary: चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झाला होता पुलवामा अटॅक; 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून 12 दिवसांत घेतला होता बदला

इतकेच नाही तर पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जाही भारताकडून काढून घेण्यात आला.

Pulwama Attack (PC- ANI)

Pulwama Attack 4th Anniversary: 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमियुगलांसाठी खूप खास असतो. या दिवशी लोक आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस जगभर साजरा केला जातो. 2019 मध्ये 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला झाला नसता तर भारतात सर्व काही असेच झाले असते. पुलवामा हल्ल्यात भारतात व्हॅलेंटाईन डेचा उत्सव कायमचा विरळा. कारण, चार वर्षांपूर्वी याच दिवशी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान एकत्र शहीद झाले होते. यात 40 जवान शहीद झाले. हा दिवस विसरणे सर्वचं भारतीयांसाठी खूपचं अवघड आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) अनेक महिने देश अस्वस्थ होता. दुर्घटनेला चार वर्षे उलटून गेली, पण सर्वसामान्य भारतीय हा दिवस कधीच विसरणार नाही. स्फोटकांनी भरलेल्या कारसह आत्मघातकी हल्लेखोराने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि सर्व काही उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर सर्वत्र याचे पडसाद उमटले. टीव्ही स्क्रीन असो की मोबाईल फोन, सगळीकडे फक्त आक्रोश व्यक्त होत होता. या क्रूर हल्ल्यात विकृत मृतदेह, उद्ध्वस्त ट्रकचे फोटो व्हायरल होत होते. (हेही वाचा -Pulwama Attack Anniversary Messages 2023: पुलवामा हल्ल्याला 4 वर्ष पूर्ण, श्रद्धांजली संदेशच्या माध्यमातून शहिदांना करा नमन)

मात्र, या हल्ल्यानंतर भारताने ज्या प्रकारे पाकिस्तानला धडा शिकवला, तो यापूर्वी कधीच घडला नव्हता. भारताने कठोर पावले उचलत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या रूपाने प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानात घुसून तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

कसा घडून आणला गेला पुलवामा हल्ला?

2019 मध्ये 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला घडून आणण्यात आला. सीआरपीएफचा ताफा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. या ताफ्यातील बहुतांश बसमध्ये जवान बसले होते. जेव्हा हा ताफा पुलवामाला पोहोचला तेव्हा पलीकडून एक कार आली आणि त्या ताफ्याच्या बसला धडकली. बसला धडकलेल्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती. अशा परिस्थितीत टक्कर होताच स्फोट झाला आणि त्यात 40 CRPF जवान शहीद झाले.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडले. इतकेच नाही तर पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जाही भारताकडून काढून घेण्यात आला. त्यामुळे आर्थिक आघाडीवर पाकिस्तानला मोठा फटका सहन करावा लागला.