Himachal Pradesh Road Accident: शिमला येथे बस दरित कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरु

हिमाचल प्रदेश रोड ट्रान्सपोर्ट आणि कॉर्पोरेशनच्या बसचा अपघात झाला.

Himachal Pradesh Road Accident PC TW

Himachal Pradesh Road Accident: हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेश रोड ट्रान्सपोर्ट आणि कॉर्पोरेशनच्या बसचा अपघात झाला. या घटनेत बस चालक आणि कंडक्टर सह चार जणांचा मृत्यू झाला. शिमला जिल्ह्यातील रोहरू भागात कुड्डू- दिलतारीच्या दिशेने बस जात होती. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- महिलेने चालत्या ट्रेनच्या दारात उभे राहून बनवले रील, व्हिडीओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, बस डोंगराळ रस्त्यावरून जात असताना, थेट दरीत कोसळली, दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. जुब्बलच्या कैंची भागात ही दुर्घटना घडली. बस पहाटे 6.45 च्या सुमारास दरीत कोसळली. बसमध्ये सात जण होते. तीन जण गंभीर जखमी झाले आहे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. बस कुड्डू दिलतारीच्या दिशेने जात होते त्यावेळीस अचानक अनियंत्रित होऊन बस दरीत कोसळली,

अपघाताचा फोटो 

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस प्रशासनाने सांगितले की, दोन जण जागीच मरण पावले तर कंडक्टर आणि बस चालकाला रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. करम दास  (बस चालक), राकेश कुमार (कंडक्टर), बिरमा देवी, धन शाह असं अपघातात मृत झालेल्यांची ओळख पटली आहे. जियेंदर रंगटा, दीपिका आणि हस्त बहादूर असं अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहे. अपघातानंतर शहरात हळहळ पसरले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif