Chandigarh Court Firing: चंदिगड न्यायालयात ठो..ठो..ठो; सस्पेंड पोलीस महानिरीक्षकाने जावयावर भरकोर्टात गोळ्या झाडल्या (Watch Video)
या हल्ल्यात जावई आयआरएस अधिकारी याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Chandigarh Court Firing: चंदिगडच्या जिल्हा न्यायालयात निलंबित अतिरिक्त पोलीस महासंचालक ( एआयजी) ने त्याच्या जावयावर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जावई आयआरएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर व्हिडीओ व्हायरल झाला. संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे. सासऱ्याने जावयावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन गोळ्या त्याला लागल्या आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वााचा:Somalia Terrorist Attack: सोमालियातील लिड्डो बीचवर आत्मघाती बॉम्बहल्ला आणि गोळीबार; 32 ठार, 63 जखमी (Watch Video) )
मिळालेल्या माहितीनुसार, हरप्रीत सिंग असे जावयाचे नाव आबे. ते कृषी विभागात आयआरएस पदावर कार्यरत होते. दरम्यान पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला सुरू असल्यामुळे ते चंदिगड जिल्हा न्यायालयात पोहोचले होते. सुनावणीदरम्यान त्यांचे सासरे निलंबित एआयजी मानवाधिकार मलविंदर सिंग सिद्धूही न्यायालयात पोहोचले होते. न्यायालयात सुनावणी सुरू असताना दोन्ही पंक्षकारांशी चर्चा सुरू असताना मानवाधिकार यांनी वॉशरूममध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली.
पोस्ट पहा
वॉशरूम दाखवण्यासाठी जावई हरप्रीत मानवाधिकारला घेऊन गेले. त्यानंतर आरोपी सासरा मानवाधिकारने बंदुक काढून एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या हरप्रीतला लागल्या. गोळीबाराचा आवाज संपूर्ण न्यायालय ऐकू गेला. कोर्टात उपस्थित सर्व वकील आणि कर्मचाऱ्यांनी वॉशरूमकडे धाव घेतली आणि मानवाधिकारला एका खोलीत बंद केले.
वकिलांनी जखमी हरप्रीतला तातडीने ॲम्ब्युलन्स बोलवून सेक्टर 16 रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हरप्रीतला मृत घोषित केले.