Chhattisgarh Poisonous Gas Leaks From Well: छत्तीसगडमधील जंजगीर-चांपा येथे विहिरीतून विषारी वायूची गळती; 5 जणांचा मृत्यू
ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजता घडली. राजेंद्र जैस्वाल नावाचा व्यक्ती विहिरीच्या आत गेली. त्याला वाचवण्यासाठी एकामागून एक जण आत गेले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
Chhattisgarh Poisonous Gas Leaks From Well: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील जांजगीर चंपा (Janjgir-Champa) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जांजगीर-चंपा येथील विहिरीतून विषारी वायूची गळती (Poisonous Gas Leaks) झाली. या गॅस गळतीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजता घडली. राजेंद्र जैस्वाल नावाचा व्यक्ती विहिरीच्या आत गेली. त्याला वाचवण्यासाठी एकामागून एक जण आत गेले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किकिर्डा गावात ही घटना घडली. येथे एक व्यक्ती लाकूड काढण्यासाठी विहिरीत उतरला होता. विहिरीच्या आत जाताच त्याला विषारी वायूमुळे त्रास झाला. यानंतर त्यांचे शेजारी रमेश पटेल हेही त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत गेले, मात्र रमेशलाही गुदमरायला सुरुवात झाली. (हेही वाचा -Hisar School Bus Accident: हरियाणाच्या हिस्सारमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली बस चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे अनेक वाहनांना धडकली)
या दोघांनंतर रमेश यांची दोन मुले राजेंद्र आणि जितेंद्र वडिलांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र विषारी वायूमुळे त्यांनाही श्वास घेण्यास अडथळा येऊ लागला. यानंतर शेजारी राहणारा टिकेश चंद्र नावाचा तरुणही विहिरीत पडला आणि त्याचाही मृत्यू झाला. (हेही वाचा - Accident Caught on Camera in Haryana: ब्रेक फेल झाल्यामुळे स्कूल बसची अनेक वाहनांना धडक, दुचाकीस्वार जखमी)
दरम्यान, विषारी वायूमुळे एकापाठोपाठ एक विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. आजूबाजूच्या लोकांना माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार व बिररा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगितले आहे.