Chhattisgarh: छत्तीसगडमधील सर्वात मोठ्या गनपावडर फॅक्टरीला आग, 6 जण जखमी

या घटनेत 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र अद्याप मृत आणि जखमींबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Gunpowder Factory Fire (PC - X/ANI)

Chhattisgarh: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील सर्वात मोठ्या गनपावडर कारखान्यात (Gunpowder Factory) शनिवारी सकाळी मोठा स्फोट (Explosion) झाला. यानंतर कारखान्याला आग (Fire) लागली. बेमेत्रा जिल्ह्यापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरसी नावाच्या गावात ही आगीची घटना घडली. या घटनेत 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र अद्याप मृत आणि जखमींबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

तथापी, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीचे कारण समजू शकलेले नाही. एसडीआरएफ आणि पोलिस प्रशासनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिकाही पाचारण करण्यात आली आहे. (हेही वाचा - Children Died Due To Drowning In The River: मध्यप्रदेशमध्ये नदीत बुडून 3 मुलांचा मृत्यू, SDRF च्या पथकाने दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले; एकाचा शोध सुरू)

बेमेत्रा येथील स्फोटक कारखान्यात झालेल्या स्फोटाबाबत, डॉ भीमराव आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सहाय्यक प्राध्यापक, डॉ शिवम पटेल यांनी सांगितलं की, 'एकूण सात रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता, बाकीच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सहा रुग्णांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. एक्स-रे केल्यानंतरच फ्रॅक्चरची पुष्टी होऊ शकते.'

पहा व्हिडिओ -

ही आग एवढी भीषण होती की, त्याच्या ज्वाळा लांबपर्यंत दिसत आहेत. कारखान्यातील स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. घटनेच्या वेळी कारखान्यात कर्मचारी उपस्थित असल्याने या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीच्या ठिणग्यांमुळे आजूबाजूच्या निवासी वस्त्यांचेही नुकसान झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif