Bihar Shocker: आंबे वाटपावरून 4 भावांमध्ये हाणामारी; भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईची मोठ्या मुलाने केली हत्या

या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Bihar Shocker: बिहार (Bihar) मधील गोपालगंज जिल्ह्यातून एका मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. वास्तविक, घटनेपूर्वी आरोपी आणि त्याच्या इतर तीन भावांमध्ये आंब्याच्या वाटपावरून भांडण झाले होते. म्हातारी आई वाद मिटवण्याचा प्रयत्न करत होती. याचा राग येऊन मोठ्या मुलाने आईवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आणि काही वेळाने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घरी आंब्याचे झाड आहे. शनिवारी झाडावरून आंबे तोडण्यात आले. त्यानंतर त्या आंब्याच्या वाटपावरून चार भावांमध्ये भांडण झाले. भाऊ भांडू लागले तेव्हा वृद्ध आई बटोरा देवी त्यांना सोडवण्यासाठी आणि समजावण्यासाठी मध्यभागी पोहोचली. यादरम्यान मोठा मुलगा रमाशंकर मिश्रा याने आईवर हल्ला केला. ज्यानंतर आईचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. (हेही वाचा - Hyderabad Shocker: हैद्राबादमध्ये भोलकपूर परिसरात विजेची तार पडल्याने तरुणाचा मृत्यू)

पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार शस्त्रांसह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. लवकरच आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असून तेथून त्याच्या पोलिस कोठडीतही वाढ होऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. मुलाने आईची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.



संबंधित बातम्या