Nainital Accident: नैनितालमध्ये भीषण रस्ता अपघात, 200 मीटर खोल खड्ड्यात पडली पिकअप; चालकासह 8 जणांचा मृत्यू

पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. चालक राजेंद्र कुमार याशिवाय गाडीत नऊ नेपाळी मजूर होते.

Nainital Accident (PC - X/ANI)

Nainital Accident: नैनितालजवळील (Nainital) बेतालघाट भागातील मल्ला गावात उंचाकोट मोटर रोडवर सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक पिकअप 200 मीटर खोल खड्ड्यात पडली. या अपघातात (Accident) चालकासह आठ जणांचा मृत्यू झाला. वाहनात प्रवास करणारे दोन नेपाळी मजूरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस स्टेशनचे प्रमुख अनीस अहमद यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा पिकअप खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. चालक राजेंद्र कुमार याशिवाय गाडीत नऊ नेपाळी मजूर होते. (हेही वाचा -West Bengal Fire: हावडामधील ताग कारखाना आगीच्या विळख्यात; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू (Watch Video))

परिसरात पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचे काम आटोपून सर्वजण परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नेपाळी मजुरांची नावे आणि घरे अद्याप समजू शकलेली नाहीत. या अपघातात जखमी झालेले मजूर शुद्धीवर आल्यानंतरच मृत व्यक्तींची माहिती मिळू शकते, असंही पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif