Kolkatta: अभिनेत्री पायल मुखर्जी हीच्यावर जीवघेणा हल्ला, कारची तोडफोड, पोलिसांकडे कडक कारवाईची केली मागणी (Watch Video)
शुक्रवारी संध्याकाळी तिच्यावर हल्ला झाला. दुचाकीवर आलेल्या एकाने तिच्यावर हल्ला केला. त्यावेळीस पायलने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला
Kolkatta: बंगाल येथीलअभिनेत्री पायल मुखर्जी हीच्यावर जीव घेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी तिच्यावर हल्ला झाला. दुचाकीवर आलेल्या एकाने तिच्यावर कारची तोडफोड केली. त्यावेळीस पायलने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत तीने सांगितले की, तीच्यावर हल्ला झाला आणि कारची काच फोडली. सुदैवाने अभिनेत्रीला दुखापत झालेली नाही. (हेही वाचा- निष्पाप मुलींचे एकदा नव्हे तर अनेकदा झाले लैंगिक शोषण, एसआयटीने सांगितले शाळा प्रशासनही जबाबदार
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. २३ ऑगस्ट रोजी @erbmjha या वापरकर्त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला. तीने सांगितले की, तिच्या कारच्या खिडक्या फोडणाऱ्या एका माणसाने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोर कोण होता माहीत नाही. हल्ल्याची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाई करावी, व्हिडिओमध्ये तीनं कारची काच फोडल्याचे दाखवले आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
ही घटना कोलकत्ताच्या पॉश भागात दक्षिण अव्हेन्यू येथे घडली आहे. व्हिडिओत कारच्या काचा तुटलेल्या दिसत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीवर कोणी हल्ला केला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु झाली आह.