Gujarat Accident: गुजरातमध्ये भीषण अपघात, बस आणि ट्रकची धडक, चार जणांचा मृत्यू

राज्य परिवहन बस आणि ट्र्रक यांच्यात धडक झाली आणि अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे.

Accident PC PIXABAY

Gujarat Accident: गुजरात राज्याच्या पाटणा जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. राज्य परिवहन बस आणि ट्र्रक यांच्यात धडक झाली आणि अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. हा अपघात राधनपूर शहरातील खारी पुलाजवळ घडला. हा अपघात इतका भीषण होता की,दोन्ही वाहनांचे समोरली भागाचे नुकसान झाले आहे. (हेही वाचा- मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विमानतळावर साचले पाणी, पाहा व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांना घेऊन आनंदहून कच्छच्या दिशेने जात होती त्यावेळीस हा अपघात घडला. ट्रक विरुध्द दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात धडक लागली. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघाता दोन चालकांचा, कंडक्टरचा आणि क्लिनरचा मृत्यू झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले.

अपघाताची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून चार मृतदेह ताब्यात घेतले. ट्रक चालकाचा आणि क्लिनरचा अद्याप ओळख पटलेली नाही. कानुजी आणि लालभाई ठाकोर असं मृतांची नावे समोर आली आहे. अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif