Madhya Pradesh Pachore Accident: बस पूलावरून कोसळल्याने भीषण अपघात, दोन जण ठार, प्रवाशी जखमी
मध्य प्रदेशातील राजगड येथे भीषण अपघात झाल्याचीधक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळल्याने हा अपघात झाला.
Madhya Pradesh Pachore Accident: मध्य प्रदेशातील राजगड येथे भीषण अपघात झाल्याचीधक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. (हेही वाचा- पोर्शे कारच्या अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना अटक, संभाजीनगर येथून घेतेले ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी कचाकच भरलेली बस अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली. पाचोर परिसरातील सद्गुरी ढाब्यावर हा अपघात झाला. बस इंदोरच्या गुनाच्या दिशेने जात होती. बसचा अपघात झाल्यावर तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात दाखल केले. स्थानिक लोकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
VIDEO | At least two people were killed and several injured after a bus fell off a culvert near Pachore in Madhya Pradesh on the Mumbai-Agra National Highway. More details are awaited.
(Full video available on PTI Videos - www. https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/snYDE9EcyR
— Press Trust of India (@PTI_News) May 21, 2024
या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. बस खाली कोसळल्याने बसचा अक्षरश: चुराडा झाला आहे. बसमध्ये ४०हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत आहे. या घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहे. शासकिय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे. अपघातानंतर पोलिसांच्या मदतीने वाहतुक सेवा सुरळीत करण्यात आली. बस पुलावरून कशी पडली याचं नेमकं कारण पोलिस शोधत आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2024 10:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

