Madhya Pradesh Crime: जमिनीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या, चार जणांना अटक, खांडवा येथील घटना

खांडवा येथील दगडखेडी गावात एक शेतकऱ्याला ट्रॅकरने चिरडले आहे. नारायण असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील खांडवा येथे जमिनीच्या वादावरून एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. खांडवा येथील दगडखेडी गावात एक शेतकऱ्याला ट्रॅकरने चिरडले आहे. नारायण असं मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस पुढील चौकशी तपासणी सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केले आहे. (हेही वाचा- भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

मिळालेल्या माहितीनुसार,दोन्ही गटामध्ये अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरु होता. सुमनबाई, नारायण आणि रीना हे  पीकाची पेरणी करत असताना भगवानदास, रमेश राठोड, प्रमोद राठोड आणि दिनेश मीना हे चार जण ट्रॅक्टर घेऊन आले आणि त्यांनी जमिनीचा ताबा असल्याचा दावा केला. नारायण यांनी भगवानदास यांना ट्रॅक्टरखाली त्यांचे पीक चिरडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु भगवानदास यांनी टॅक्टर त्यांच्या अंगावर चालवला. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शेतात आरडोआरड सुरु झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक तपास सुरु केला आणि नारायण यांच्या मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. नारायण यांच्या हत्ये प्रकरणी भगवानदाससह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुध्दात कलम 302, 307, 34 असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हरसूद पोलिसांच्या पथकाने तात्काळ चार आरोपींना अटक केले.