Fake Nurses Kidnap Newborn: नर्स बनून आल्या अन् बाळ चोरून गेल्या; कलबुर्गी येथील जिल्हा रुग्णालयातील घटना

पालकांनीही त्या नर्स असल्याचे समजून मूल त्यांच्या हाती दिले. पण त्या बाळाला त्या चोर महिला घेऊन पळून गेल्या.

Photo Credit- Pixabay

Fake Nurses Kidnap Newborn: कर्नाटकातील कलबुर्गी येथे जिल्हा रुग्णालयात नर्स बनून आलेल्या दोन महिलांनी नवजात बाळ चोरल्याची धक्कादायक घटना समोर (Fake Nurses Kidnap Newborn)आली आहे. त्यामुळे रुग्णालयात सुद्ध बाळ सुरक्षित नसल्याची भिती आता अनेक मातांना सतावत आहे. बाळाची रक्त तपासणी करायची असल्याची बतावणी चोरट्या महिलांनी(Newborn Kidnap) कुटुंबीयांना केली. पालकांनीही त्या नर्स असल्याचे समजून मूल त्यांच्या हाती दिले. पण त्या बाळाला त्या चोर महिला घेऊन पळून गेल्या. (Child Swap Nashik: नाशिक येथे बालकांची आदलाबदल, मुलीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू)

ही धक्कादायक घटना 25 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता रुग्णालयाच्या 115 वॉर्डमध्ये घडली. बाळ जा्त वेळ झालं आपल्यकडे सोपवलं गेलं नाही. या चिंतेत पालक रामकृष्ण आणि कस्तुरी यांनी विचारणा केली तेव्हा रुग्णालात काही काळ गोंधळ निर्माम झाला. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन नंतर याप्रकरणी रुगणालय प्रशासनाने पालकांसह ब्रह्मपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तेथे तक्रार दाखल केली. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. (Asia's First Breast Milk Bank at Sion Hospital: मुंबई येथील सायन रुग्णालात 'ब्रेस्ट मिल्क' बँकेद्वारे 10,000 नवजात बालकांना दूध पुरवठा)

रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यामध्ये महिला नवजात बाळाला घेऊन रुग्णालयाबाहेर पळताना दिसल्या. तेव्हा बाळाची चोरी झाल्याचा उलगडा झाला. फुटेजमध्ये दोन महिलांपैकी एकीने तोंडावर मास्क बांधला होता. तर दुसरीने त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलेले होते. दोघेही काही वेळ हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये बोलतानाच आढळल्या.

रुग्णालयातून बालक चोरीची ही पहिलीच घटना नसून आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्याच इतरांनी सांगितलं आहे. नवजात बाळांच्या चोरीची एशीच एक घटना काही दिवसांपूर्वी दिल्लीतून समोर आली होती. सीबीआय आणि पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील केशव पुरम भागातील एका घरावर छापा टाकला होता. दोन दिवस चाललेल्या या छाप्यानंतर सीबीआयने मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत 7 ते 8 नवजात बालकांची सुटका केली. त्यांचे वय जवळपास 10 वर्षांपेक्षा कमी होते. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका नवजात बाळाचे वय केवळ 36 तास होते. तर दुसऱ्याचे वय 15 दिवस होते.