Ghaziabad Video: कालव्यात बुडत असलेल्या युवकाला जीवदान: मदतीसाठी धावले माजी नेव्ही कंमाडो (Watch video)
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Ghaziabad Video: युपीच्या गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापुरमध्ये माजी नौसेनेचे कमांडो धनवीर सिंग नेगी यांनी कालव्यात उडी मारून पाण्यात बुडणाऱ्या युवकाला वाचवले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे कालव्या बुडणाऱ्या व्यक्तीला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली. (हेही वाचा- शाळा सुटली, शिक्षकांसह वॉचमन घरी गेले, वर्गात राहिला विद्यार्थी; पाहा पुढे काय झाले (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, नेव्हीचे माजी कमांडो धनवीर सिंग आपल्या मित्रासोबत कार्यालयातून दुपारी ४.१५च्या सुमारास घरी जात होते. त्यावेळीस गौर ग्रीन कालव्याजवळ लोकांची गर्दी पाहायला मिळाली. तेथे थांबल्यावर समजले की, एक युवक कालव्यात बुडत आहे. त्याचे वडिल मदतीसाठी आरडाओरड करत आहे. त्यावेळी कोणताच विचार न करता धनवीर यांनी तरुणाला वाचवण्यासाठी कालव्यात उडी मारली.
स्थानिकांनी बघण्याची भुमिका घेतली कोणीही पुढे येत आले नाही असं व्हिडिओत दिसत आहे. कालव्यात उडी मारून धनवीर यांनी युवकाला वाचले. कालव्यातून बाहेर काढून युवकाला सीपीआर देवून त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले. युवकाला त्याच्या वडिलांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आङे.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी कौतुक करत आहे. युवक कालव्यात कसा पडला हे अद्याप समोर आले नाही. या घटनेनंतर धनवीर यांच्या वीर कृत्याबद्दल गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.