Bhopal: फोन उचलणे बंद केला म्हणून विवाहित तरूणाने एक्स गर्लफ्रेन्डचा चिरला गळा, भोपाळ येथील घटना

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Representational Image (Photo: Twitter)

फोन उचलणे बंद केल्याच्या रागातून एका विवाहित तरुणाने एक्स गर्लफ्रेन्डचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पीडित तरूणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) येथे घटली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घनटेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोपीचे पीडित तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी आरोपीने अन्य दुसऱ्या मुलीने लग्न केले. परंतु, आरोपीला लग्न केल्यानंतरही पीडितासोबत मैत्री कायम ठेवायची होती. ज्यामुळे पीडित आरोपीकडे दुर्लक्ष करीत होती. तसेच तिने आरोपीचा फोनही उचलणे बंद केले होते. यामुळे आरोपी बेचैन झाला आणि रागाच्या भरात आरोपीने पीडिताच्या घराजवळ जाऊन सुरीने तिचा गळा चिरला. हे देखील वाचा- Meerut: बायकोचा माहेरहून परतण्यास नकार, संतप्त नवऱ्याकडून पोटच्या दोन अल्पवयीन मुलीची हत्या

या प्रकरणी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर आरोपीला उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरातून अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता पीडिताला फोन करूनही ती भेटीस नकार देत होती, यातूनच तिला ठार करण्याचा प्रयत्न केला असा जबाब आरोपीने पोलिसांना दिला आहे.