Jammu and Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 जवान शहीद, पाकिस्तानी दहशतवादी ठार
कमकारी भागात पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले.
Jammu and Kashmir Encounter: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) च्या कुपवाडा (Kupwara) सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. सुरक्षा दल (Security Force) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक (Encounter) झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. कुपवाडा येथील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) जंगलात झालेल्या चकमकीत पाच जवान जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीं जवानांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेल्याचे वृत्त आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवान कमकारी भागात शोध मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. कमकारी भागात पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर लष्कराने ही शोध मोहीम सुरू केली. हल्ल्यानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले. अतिरिक्त जवानांना जंगलात पाठवून शोध घेतला जात आहे. (हेही वाचा - Encounter In Kulgam: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; एक जवान शहीद)
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील कोवुत भागात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले नॉन-कमिशन्ड ऑफिसर दिलावर सिंह यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार केले होते. मंगळवारी पुंछमध्ये चकमक झाली, ज्यात लान्स नाईक सुभाष कुमार शहीद झाले. (हेही वाचा - Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमकीत शहीद झालेले जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार (Watch Video))
जम्मूमध्ये वाढत्या दहशतवादी घटना -
2008 नंतर पुन्हा एकदा सातत्याने दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 46 दिवसांत सात दहशतवादी घटनांमध्ये 11 लष्करी जवानांचा बळी गेला असून 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, आता यावर निर्णायक रणनीती आखण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वेळी दहशतवादी हल्ला करून गायब झाले. या दहशतवाद्यांचे जंगलातील अस्तित्व अजूनही लोकांना त्रास देत आहे.