EPFO च्या कर्मचार्‍यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत एक दिवसाचा पगार देण्याचा घेतला निर्णय

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे देशाला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे.

EPFO (Photo Credits-Facebook)

भारतात कोरोना विषाणूचे (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनामुळे देशाला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. एवढचे नव्हेतर या भयंकर माहामारीमुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे. यातच कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहायता निधीच्या (PM CARES Fund) स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनाला संपूर्ण देशातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत (EPFO)  कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार पतंप्रधान सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याची माहिती दिली आहे.

भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे. दरम्यान, कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाला अर्थिक संकाटाला समोरे जावा लागत आहे. यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत आपला एक दिवसाचा पगार देण्याच्या निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे एकूण योगदान अडीच कोटी रुपये आहे, अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus Lockdown: राजधानी दिल्लीत Containment Zones वगळता 450 दारूची दुकाने उघडण्यास परवानगी

एएनआयचे ट्वीट-

देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे पंतप्रधान सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना पंतप्रधान सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.