Qatar Airways: दिल्ली-दोहा विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांची 3 तास झाली गैरसोय

प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगण्यात आले आणि त्यांना जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रान्झिट लाउंजमध्ये पाठवण्यात आले.

विमान | संग्रहीत आणि प्रतिकात्मक प्रतिमा

कतार एअरवेजच्या (Qatar Airways) दिल्ली ते दोहा (Delhi to Doha Flight) विमानाचे कराची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या फ्लाइटमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते. एअरलाइन्सने या संदर्भात एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, विमानाच्या कार्गो परिसरात धुराचे संकेत मिळाल्यावर वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगसाठी कराची विमानतळ (Karachi International Airport) एटीसीकडून परवानगी मागितली, त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरले. फ्लाइटमध्ये बसलेल्या एका भारतीय प्रवाशाने मनी कंट्रोलला मजकुर संदेशाद्वारे स्वतःला, त्याच्या कुटुंबाला आणि इतर प्रवाशांना येणाऱ्या समस्यांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, सोमवारी पहाटे साडेपाच वाजता विमान कराचीत उतरले. प्रवाशांना विमानातून खाली उतरण्यास सांगण्यात आले आणि त्यांना जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रान्झिट लाउंजमध्ये पाठवण्यात आले.

त्यांनी पुढे लिहिले की, आम्हाल तीन तास अन्न पाण्याशिवाय ठेवण्यात आले. प्रवाशांनी विमानतळ कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतरच जेवण, चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या विमानात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले होती. ते म्हणाले की, प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासाठी वाय-फाय सेवाही दिली गेली नाही. वायफाय फक्त पाकिस्तानी नंबरवरच वापरता येईल. प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देता आली नाही. (हे देखील वाचा: Hijab Row: हिजाब प्रकरणी निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी,कर्नाटक सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा)

Tweet

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तक्रारींवर प्रतिक्रिया देताना सांगितले की ते यावर लक्ष घालतील. थोड्या वेळाने, सिंधिया यांनी ट्विट केले की कराची विमानतळावर प्रवाशांना जेवण देण्यात आले आहे आणि कतारहून बदली विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.