भुवनेश्वरहून पुण्याला जाणाऱ्या Air Asia Airline विमानाचे Emergency landing
त्यानंतर विमान भुवनेश्वरमध्ये उतरवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान भुवनेश्वरच्या 'बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर' उतरवण्यात आले आहे.
ओडिशातील भुवनेश्वरहून पुण्याला जाणाऱ्या एअर एशिया एअरलाइनच्या (Air Asia Airline) विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (Emergency landing) करण्यात आले आहे. विमान परत आणून भुवनेश्वरमध्ये उतरवण्यात आले आहे. विमान उड्डाण केल्यानंतर पक्षी विमानावर आदळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर विमान भुवनेश्वरमध्ये उतरवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान भुवनेश्वरच्या 'बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर' उतरवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, विमानाला झालेल्या संभाव्य हानीचा अंदाज घेतला जात आहे.
त्याचवेळी एअर एशिया एअरलाइनच्या वतीने निवेदन जारी करून या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, पक्षी आदळल्यानंतर विमान सविस्तर तपासणीसाठी परत भुवनेश्वरला आणण्यात आले. कंपनीने सांगितले की, आम्ही प्रवाशांना सेवा देत आहोत आणि या घटनेचा इतर नियोजित उड्डाणांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी पावले उचलत आहोत. हेही वाचा Kailasa At UN Meet: नित्यानंदना झटका; काल्पनिक देशाच्या विधानाकडे दुर्लक्ष करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय
पक्षी विमानांना धडकण्याच्या घटना अनेकदा पाहायला मिळतात. अलीकडेच, 26 फेब्रुवारीला गुजरातमधील सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या विमानाला टेक-ऑफच्या काही वेळातच पक्षी धडकला.त्यानंतर विमान वळवून अहमदाबादला उतरवण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. 24 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आणीबाणीच्या कारणास्तव इंडिगोचे फ्लाइट '6E 2407' मध्य प्रदेशातील भोपाळ येथे उतरवण्यात आले.
विमानाने कोचीनहून दिल्लीला उड्डाण केले होते, मात्र प्रवाशाची प्रकृती खालावल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर, प्रवाशाला तात्काळ भोपाळ विमानतळाजवळील रुग्णालयात नेण्यात आले. दुसरीकडे, 24 फेब्रुवारी रोजी, कालिकतहून दम्मामकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाची शेपूट टेक ऑफच्या वेळी जमिनीवर आदळल्याने मोठा अपघात टळला. यानंतर विमान तातडीने तिरुअनंतपुरमकडे वळवण्यात आले. विमानात दीडशेहून अधिक प्रवासी होते. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.