IPL Auction 2025 Live

Punjab: पगारासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे शोले स्टाइल आंदोलन, फाईल क्लिअर होईपर्यंत मोबाईल टॉवरवर मांडला निवारा

सोहन सिंग हा सरकारी कर्मचारी बर्नाला (Barnala) येथील बद्री (Badri) गावात प्राथमिक शाळेत तैनात होता.

Salary | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

शनिवारी 36 वर्षीय पंजाब सरकारी प्राथमिक शाळेतील (Punjab Government Primary School) शिक्षक (Teacher) सेक्टर 3 येथील एमएलए हॉस्टेलमधील (MLA Hostel) मोबाईल टॉवरवर (Mobile tower) चढला होता. सोहन सिंग हा सरकारी कर्मचारी बर्नाला (Barnala) येथील बद्री (Badri) गावात प्राथमिक शाळेत तैनात होता. पगारवाढीच्या मागणीसाठी रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्याने खाली येण्यास नकार दिला आणि कोणी जबरदस्तीने खाली आणण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सूत्रांनी सांगितले की, हा परिसर पोलिसांच्या तपासणीत असतानाही सोहन सिंग वसतिगृहाच्या आवारात प्रवेश केल्यावर कोणाच्याही लक्षात आले नाही. त्याने सोबत एक बॅग घेऊन बीएसएनएल टॉवरवरील एका छोट्या प्लॅटफॉर्मवर तात्पुरता निवारा केला.

माहिती पसरताच पंजाब शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर शाखा आणि यूटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. पंजाब एआयजी अनिल जोशी, एसएचओ पीएस 17, इन्स्पेक्टर ओम प्रकाश आणि पंजाबचे शिक्षण सचिव यांनी फोनवर सोहन सिंग यांना खाली येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला. शिक्षण सचिवांशी बोलताना तो रडू लागला. हेही वाचा Shocking! नैराश्येने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या हातून घडले धक्कादायक कृत्य; लहान मुलांसह 5 जणांची केली हत्या, पोलिसांकडून अटक

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, सोहन सिंग हे 180 ईटीटी शिक्षकांपैकी एक आहेत ज्यांची 2016 मध्ये अतिरिक्त संख्येत नोंदणी झाली होती. राज्य सरकारने त्यांना ईटीटी शिक्षकांच्या नवीन भरतीमध्ये समायोजन करण्याचे आश्वासन दिले. जे लवकरच केंद्र सरकारच्या नियमांनुसार होईल. पंजाब सरकारच्या एका ईटीटी शिक्षकाचा पगार सुमारे 60,000 रुपये आहे. जो केंद्र सरकारच्या धर्तीवर कामावर घेतलेल्या व्यक्तीच्या पगाराच्या दुप्पट आहे.

सोहन सिंगसह 180 शिक्षकांनी पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यांनी त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सूत्रांनी सांगितले की, सोहन सिंग काही दिवस पुरेल एवढी खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन टॉवरवर चढला होता. पगाराची फाईल क्लिअर झाल्यावर खाली येईन, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा वृत्त लिहेपर्यंत सोहन टॉवरच्या वर बसला होता.