Chief Election Commissioner of India: सुशील चंद्रा होणार भारताचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला स्विकारणार पदभार

सुशील चंद्रा 13 एप्रिल रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्विकारणार आहेत. कारण, त्याच दिवशी विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा सेवानिवृत्त होत आहेत.

Sushil Chandra (PC - PTI)

Chief Election Commissioner of India: निवडणूक आयुक्त (Election Commission) सुशील चंद्रा (Sushil Chandra) हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner of India) असणार आहेत. निवडणूक आयोगातील सर्वात वरिष्ठ आयुक्तांची नेमणूक मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून करण्याची परंपरा आहे. सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्रा यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. सुशील चंद्रा यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून घोषित करण्यासंदर्भातील आदेश कोणत्याही वेळी जारी केला जाऊ शकतो.

चंद्रा यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी 14 फेब्रुवारी 2019 रोजी निवडणूक आयुक्त करण्यात आले होते. सुशील चंद्रा 13 एप्रिल रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्विकारणार आहेत. कारण, त्याच दिवशी विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा सेवानिवृत्त होत आहेत. सुशील चंद्रा हे 14 मे 2022 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळतील. निवडणूक आयोगात येण्यापूर्वी ते केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष होते. (वाचा -Justice NV Ramana कोण आहेत? जाणून घ्या भारताच्या 48 व्या सरन्यायधीशांच्या न्यायप्रक्रियेतील कारकीर्दी बाबत)

नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी मार्चमध्ये होणार आहेत. उत्तर प्रदेश वगळता उर्वरित विधानसभांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपेल. तर उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 14 मे रोजी संपत आहे.