Haryana Cow Attack: भटक्या गायींच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, कुरुक्षेत्र येथील घटना (Watch Video)
हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भटक्या गायीच्या हल्ल्येत एका वृध्द महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गायीने महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडिओ एकाने फोनमध्ये कैद केला.
Haryana Cow Attack: हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भटक्या गायीच्या हल्ल्येत एका वृध्द महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गायीने महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडिओ एकाने फोनमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गायीने महिलेला पायदळी तुटवले आहे. या घटनेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. (हेही वाचा- बोअरवेलमध्ये पडून ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी २७ जुलै रोजी हरियाणा येथील कुरुक्षेत्र येथे ही घटना घडली. वृध्द महिला काठीच्या सहाय्याने घराच्या गेटवर आली तेवढ्यात तीन गायी जवळ आल्या. नंतर महिलेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गायींनी महिलेला पायदळी तुडवले. गुरदीप कौर (65) असं पीडितेचे नाव आहे. तिच्या घरासमोरचं मृत्यू झाला. महिला घटनेतून वाचू शकली नाही.
कुरुक्षेत्र में यमराज बनी गाय,वृद्धा को पटक-पटककर उतारा मौत के घाट, घर के बाहर झाड़ू लगा रही थी मेहला ।#JusticeForSidhuMooseWala pic.twitter.com/K2NkAkcWPV
— Reet kaur gill (@ReetGill02) July 29, 2024
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिलेला वाचवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले. एक महिलेने गायींना दूर करण्यासाठी दगडफेक केला पंरतु त्या काही बाजूला झाल्या नाही. भटक्या जनावरांचा वावर जास्त झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेकडे प्रशसासनाने दुर्लक्ष करू नये अशी विनंती स्थानिकांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरातील अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

