Punjab Accident: रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वृध्दांना अनियंत्रित कारची धडक, थरारक अपघाताचा Video आला समोर

रस्त्यावर दोन वृध्द जोडपे उभे होते त्यावेळी अचानक एक कार अनियंत्रित झाले आणि दोघांना कारने उडवले.

Accident video TWITTER

Punjab Accident: पंजाब येथील रस्ता अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावर दोन वृध्द जोडपे उभे होते त्यावेळी अचानक एक कार अनियंत्रित झाले आणि दोघांना कारने उडवले. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या अपघातात दोघे ही गंभीर जखमी झाले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे,  कार रस्त्यावरून जात होती परंतु रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना कारने जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघे ही काही अंतरावर फेकले गेले. (हेही वाचा- अज्ञात वाहनाची धडक कारला, दोन जणांचा मृत्यू, बुलढाणा येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ही घटना पंजाब येथील मुक्तसर येथील आहे. अनियंत्रित कारने पुढे जाऊन एकाला धडक दिली आहे. कार पुढे जाऊन एका शेल्टरमध्ये घुसली. अपघात झाल्यानंतर माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस आणि रुग्णावाहिका दाखल झाली. वृध्दांना धडक दिल्यानंतर कार चालक घटना स्थळावरून फरार होण्याच्या प्रयत्न करत होता त्यावेळी पुढे जाऊन एका स्कूटीला धडक दिली.

अपघात अनेकांना किरकोळ जखमा झाल्या आहे. ही घटना संपूर्ण जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पोलिसांनी कार चालकांला अटक केले आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ खळबळ माजली होती.