भारतातील विद्यार्थी वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी युक्रेन मध्ये का जातात? जाणून घ्या अधिक

याच दरम्यान बहुतांश भारतीय विद्यार्थींसह नागरिक युक्रेन येथे अडकून पडले आहेत. मात्र बहुतांश जण हे येथे वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी आले होते. युक्रेनच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, येथे 18,095 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.

Representational Image (Photo Credits: pixabay)

युक्रेन-रशियामध्ये सध्या युद्ध सुरु आहे. याच दरम्यान बहुतांश भारतीय विद्यार्थींसह नागरिक युक्रेन येथे अडकून पडले आहेत. मात्र बहुतांश जण हे येथे वैद्यकिय अभ्यासक्रमासाठी आले होते. युक्रेनच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, येथे 18,095 भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. ऐवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी हे हरियाणा, पंजाब येथील आहेत. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी एमबीबीएस (MBBS) च्या अभ्यासक्रमासाठी येतात. भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये एमबीबीएस करणे अधिक सुविधाजनक आहे. मात्र भारतीय विद्यार्थी युक्रेनलाच का येतात आणि त्यामुळे त्यांचा काय नेमका फायदा होतो हे सोप्प्या पद्धतीने येथे जाणून घेऊयात.

इंडियन एक्सप्रेसच्या मते, युक्रेन येथून केल्या जाणाऱ्या MBBS साठी जगभरात मान्यता आहे. इंडियन मेडिकल काउंसिल, वर्ल्ड हेल्थ काउंसिल, युरोप आणि युके मध्ये पदवीला विशेष आहे. या पद्धतीने एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना  विद्यार्थ्यांना जगातील बहुतांश देशांमध्ये काम करण्याची संधी मिळते.  त्यामुळेच भारतीय विद्यार्थ्यी युक्रेनमध्ये एमबीबीएस करतात हे एक मोठे कारण आहे.(Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षामुळे लोखंड महागले, सळ्यांचीही भाववाढ)

दुसरे कारण म्हणजे भारतात खासगी संस्थेत एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी वर्षभरात 10-12 लाख रुपये फी घेतली जाते. जवळजवळ 5 वर्षापर्यंत एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50-60 लाख रुपयांपर्यंत फी भरावी लागते. पण युक्रेनमध्ये असे होत नाही. युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी 45 लाख रुपयांची गरज असते. म्हणजेच 5 वर्षाच्या अभ्यासासाठी एकूण खर्च हा भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये कमी होतो.

देशात एमबीबीएसच्या प्रवेशासाठी नीट (NEET) चे आयोजन केले होते. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. भारतातील नीट परीक्षेतील गुण अधिक महत्वाचे असतात. पण युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना नीट मध्ये प्रवेश घेणे हे एक मोठे आव्हान असते. पण येथे गुणांचे विशेष महत्व नसल्याने भारतीय विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी युक्रेनमध्ये येणे पसंद करतात.

एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की, भारतात एमबीबीएससाठी जेवढ्या जागा आहेत त्याच्या दुप्पट पटीने विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात. जागा कमी असल्याने जे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत ते युक्रेनचा  पर्याय निवडतात. युक्रेन येथून एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी नाही आहे.

सर्वात महत्वाचे कारण असे की, युक्रेन हा इंफ्रास्ट्रक्चर संदर्भात उत्तम असल्याचे येथे येऊन एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पण भारतासारखेच येथे सुद्धा प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतो. याप्रमाणे युक्रेनमध्ये एमबीबीएस करणाऱ्याची काही कारणे आहेत जी विद्यार्थ्यांना आपल्या स्थितीनुसार ठरवता येतात.