NEET, JEE Main 2020 Admit Card विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे मिळणार? पहा तारखांबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स

NTA ने दिलेल्या माहितीनुसार, JEE Main 2020 Admit Card आणि NEET 2020 Admit Card ही त्यांच्या परीक्षा तारखांच्या 15 दिवस आधी जाहीर केली जाणार आहेत.

Representational Image (Photo Credits: unsplash.com)

नॅशनल टेस्टिंग एजंसी कडून अखेर NEET आणि JEE च्या यंदाच्या अर्जप्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. ते आता परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत. लवकरच त्यांना अ‍ॅडमीट कार्ड दिले जाणार आहेत. दरम्यान यंदा NEET 2020 परीक्षा 26 जुलै दिवशी आणि JEE Main 2020 परीक्षा 18-23 जुलै दरम्यान दोन शिफ्ट्स मध्ये घेतली जाणार आहे. NTA ने दिलेल्या माहितीनुसार, JEE Main 2020 Admit Card आणि NEET 2020 Admit Card ही त्यांच्या परीक्षा तारखांच्या 15 दिवस आधी जाहीर केली जाणार आहेत. JEE Main and NEET 2020 Exams Dates: जेईई मेन्स यंदा 19-23 जुलै दरम्यान होणार, JEE Advanced ऑगस्ट तर NEET 2020 परीक्षा 26 जुलै दिवशी!

NEET and JEE Main 2020 Admit Card कधी जाहीर केली जाणार?

NTA ने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही परीक्षांची अ‍ॅडमीट कार्ड्स ही किमान 15 दिवसआधी जाहीर केली जातील. यंदा नव्या वेळापत्रकानुसार नीट 2020 ची परीक्षा 26 जुलै दिवशी होईल. त्यामुळे या परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड 11 जुलै च्या आसपास म्हणजे जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर होऊ शकतं. तर JEE Main 2020 दोन शिफ्ट्समध्ये 18-23 जुलै दरम्यान होणार आहे. त्यामुळे त्यांच्या नियमावलीनुसार जेईई विद्यार्थ्यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अ‍ॅडमीट कार्ड मिळू शकतं.

NEET आणि JEE Main 2020 Admit Card डाऊनलोड कुठे कराल?

NTA कडून NEET आणि JEE Main 2020 Admit Card तयार झाल्यानंतर वेबसाईटवर त्याची अ‍ॅक्टिव्ह लिंक तयार होईल. nta.ac.in वर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स पाहता येतील. नॅशनल टेस्टिंग एजंसी प्रमाणेच संबंधित परीक्षांच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील त्याची लिंक असेल.

दरम्यान कोरोना व्हायरस संकटामुळे यंदा नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नीट या वैद्यकीय शाखेच्या पूर्वपरीक्षेला 16 लाख विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. त्या परीक्षा देशभरात 6 हजार केंद्रांवर होतील. तर जेईई मेन ला यंदा 9.21 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. महिन्याभरात या दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. जेईई मेन्समधून पात्र झालेले विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा देतात. दरम्यान ती परीक्षा देखील यंदा 23 ऑगस्टला होणार आहे. IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ती अत्यावश्यक आहे.