UGC Calendar 2020–21: कॉलेज आणि विद्यापीठांच्या स्थगित परीक्षा, आगामी शैक्षणिक वर्ष प्रवेश प्रक्रिया बद्दल नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या तारखा

तर शैक्षणिक वर्षाची सुरूवात सप्टेंबर 2020 मध्ये सुरू होईल. पहा यंदाच्या UGC calendar 2020-21 साठी कमिशनकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, नियमावली आणि महत्त्वाच्या तारखा.

Representational Image (Photo Credits: unsplash.com)

The University Grants Commission ने आता 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी वेळापत्रक जाहीर केलं आहे. कमिशनने परीक्षा आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी गाईडलाईंस जाहीर केल्या आहेत.दरम्यान पॅनलने सुचवलेल्या काही सुचनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या वर्षासाठी ऑगस्ट 2020 मध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. तर शैक्षणिक वर्षाची सुरूवात सप्टेंबर 2020 मध्ये सुरू होईल. पहा यंदाच्या UGC calendar 2020-21 साठी कमिशनकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, नियमावली आणि महत्त्वाच्या तारखा

सध्या भारतामध्ये फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर UGC ने विशेष सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा परिणाम अ‍ॅडमिशन आणि परीक्षांवर झाला आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान JNU, UGC NET, PhD, NEET, TTE च्या प्रवेश परीक्षा लांबणीवर.

UGC Calendar 2020-21साठी महत्त्वाची नियमावली

UGC ची नवी नियमावली ही दोन कमिटींद्वारा देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे असेल. यामध्ये एका समितीद्वारा परीक्षा आणि नवं शैक्षणिक कॅलेंडर यांबाबत सूचना देणारं होतं. तर दुसरं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाला कशी चालना मिळू शकतं यासाठी होतं.