UGC NET Admit Card 2022: युजीसी नेट परीक्षेचं अॅडमीट कार्ड जारी; ugcnet.nta.nic.in वरून करा डाऊनलोड!
एनटीए कडून UGC NET ची परीक्षा जुलै महिन्यात 9,11,12 आणि ऑगस्ट महिन्यात 12,13,14 तारखेला होणार आहेत.
द नॅशनल टेस्टिंग एजेंसी (National Testing Agency) कडून UGC NET December 2021 आणि June 2022 परीक्षांसाठी अॅडमीट कार्ड जारी करण्यात आले आहे. ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वरून आता विद्यार्थ्यांना त्यांची हॉल तिकीट्स डाऊनलोड करता येणार आहेत. 9 जुलै पासून या परीक्षांना सुरूवात होत आहे त्याची हॉल तिकीट्स जारी करण्यात आली आहेत. यंदाची परीक्षा Computer Based Test च्या स्वरूपात घेतली जाणार आहे. हे देखील नक्की वाचा: MPSC Recruitment 2022: MPSC मार्फत विविध विभागांमधील 800 नव्या पदांची भरती .
कसं डाऊनलोड कराल हॉल तिकीट
- अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
- होम पेजवर “Download Admit Card for UGC-NET Dec. 2021 and June 2022 (merged cycles) (Exam Date 9 July)” वर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन डिटेल्स टाका आणि सबमीट करा.
- आता तुमचं अॅडमीट कार्ड स्क्रिनवर दिसेल ते डाऊनलोड करा. त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकता.
इथे पहा आणि डाऊनलोड करा युजीसी नेट परीक्षेचं अॅडमीट कार्ड .
एनटीए कडून UGC NET ची परीक्षा जुलै महिन्यात 9,11,12 आणि ऑगस्ट महिन्यात 12,13,14 तारखेला होणार आहेत. टप्प्या टप्प्याने या परीक्षेच्या तारखेनुसार विद्यार्थ्यांची हॉल तिकीट्स जारी होतील. 011-4075 9000 या हेल्पलाईन नंबर वर किंवा ugcnet@nta.ac.in या वेबसाईट वर विद्यार्थ्यांनी आपल्या शंकेचं निरसन करावं असं आवाहन एनटीए कडून करण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2022 03:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

