SSC HSC Exam Results 2019 Dates: 10 वी आणि 12 वी च्या निकालाच्या तारखांबाबत WhatsApp वर फिरणार्‍या Fake Message पासून रहा सावध; शिक्षण मंडळाकडून अद्याप दुजोरा नाही

दहावी बारावी निकालाच्या तारखांची माहिती देणारा एक Whatsapp Message सध्या अनेक ग्रुप्समध्ये फिरत आहे,बोर्डाकडून याचे पुष्टी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांनी पडताळणी करून विश्वास ठेवावा

Whatsapp Fake Message On SSC &HSC results 2019 (Photo Cresits: File Photo)

SSC, HSC Board Results 2019: सीबीएसई (CBSE) व आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावी (SSC)  आणि बारावी (HSC) इयत्तेचे निकाल घोषित झाल्यावर आता महाराष्ट्र राज्य बोर्डाची (Maharashtra Board) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना देखील निकालाचे वेध लागले आहेत. दरवर्षी बारावीचा निकाल साधारणपणे मे (May) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जूनच्या (June) पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर केला जातो. याबद्दल माहिती देणारा एक व्हाट्सऍप मॅसेज (Whatsapp Message) सध्या अनेक ग्रुप्समध्ये फिरत आहे. यामध्ये सांगितल्या प्रमाणे बारावीचा निकाल हा 27 मे ला तर दहावीचा निकाल 6  जून रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर पाहता येईल असे सांगितले जातेय. याबाबत बोर्डाने तूर्तास कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसून निकालाची अंदाजे तारीख देखील सांगितलेली नाही आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याचं हे शेवटचं वर्ष होतं तसेच यंदा लोकसभा निवडणूका आणि परीक्षांचा कालावधी एकच असल्याने शिक्षकांना मतदानाच्या कामातून वगळण्यात आलं होतं त्यामुळे निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे. SSC, HSC Exam Result 2019: लवकरच जाहीर होईल HSC, SSC चा निकाल; mahresult.nic.in या वेबसाईटवर असा पहा रिझल्ट

दहावी निकाल

परीक्षा तारीख - 1 मार्च ते 22 मार्च 2019

अंदाजे निकालाची तारीख - मे 2019 चा अंतिम आठवडा ते जून महिन्याचा पहिला आठवडा.

बारावी निकाल

परीक्षा तारीख - 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च

अंदाजे निकालाची तारीख-जून महिन्याचा पहिला आठवडा.

दहावी बारावी निकाल अधिकृत संकेतस्थळ-

mahresults.nic.in,

maharashtraeducation.com, results.mkcl.org,

mahahsscboard.maharashtra.gov.in,

mahahsscboard.in

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल maharesults.nic.in, maharashtraeducation.com आणि results.mkcl.org या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये काही तारखांबद्दल माहिती पसरवली जात असल्यास त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ एकदा नक्की तपासून पहा.