SPPU Final Year Exams 2021: पुणे विद्यापीठाच्या 10 एप्रिल पासून सुरू होणार्‍या परीक्षांच्या UG, PG च्या विद्यार्थ्यांना सरावासाठी Mock Test आजपासून खुल्या!

तर 020-715302020 वर संपर्क देखील साधता देणार आहे.

SPPU Final Year Exams 2021: पुणे विद्यापीठाच्या 10 एप्रिल पासून सुरू होणार्‍या परीक्षांच्या UG, PG च्या विद्यार्थ्यांना सरावासाठी Mock Test आजपासून खुल्या!
Exam Online I (Photo Credits: Pixabay)

पुणे विद्यापीठाच्या विविध शाखेच्या ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा 10 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा यंदा ऑनलाईन होणार असल्याने त्याचा सराव म्हणून आता मॉकटेस्ट सुरू झाल्या आहेत. आज ( 5 एप्रिल) पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन Mock Test खुल्या करण्यात आल्या आहेत. या परिक्षेच्या माध्यामातून यंदा प्रत्यक्षात अंतिम परीक्षा देण्यापूर्वी या परिक्षेचं स्वरूप विद्यार्थ्यांना कळावं म्हणून सोय करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाच्या मॉक टेस्ट या यंदाच्या अंतिम परीक्षेसारख्याच असतील. प्रश्न मात्र मॉक असतील ते अभ्यासक्रमाशी निगडीत नसतील.विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेआधी एकदा त्याचं संपूर्ण सबमिशन करायचं आहे. यामध्ये जीके, कोविड शी निगडीत आणि इमेज बेस्ड अ‍ॅप्टीट्युट टेस्ट असतील. दरम्यान या मॉक टेस्टचं देखील वेळापत्रक www.sppuexam.in वर जारी करण्यात आलं आहे.वेळापत्रकानुसार इमेल आणि एसएमएस हे फेज प्रमाणे पाठवले जातील. विद्यार्थ्यांना त्यांचं युजरनेम आणि पासवर्ड हे इमेल, एसएमएस द्वारा मिळतील.

दरम्यान विद्यार्थ्यांना या मॉकटेस्ट मध्ये काही बिघाड आल्यास, तक्रारी आल्यास चॅट सपोर्ट वर त्या द्यायच्या आहेत. तर 020-715302020 वर संपर्क देखील साधता देणार आहे.

इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना विद्यापीठाचे महेश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 5 एप्रिलपासून होणार्‍या मॉक टेस्टला सुमारे 1.10 लाख विद्यार्थी सामोरे जातील. यामध्ये विज्ञान शाखेचे ग्रॅज्युएट्ससाठी 88,865 विद्यार्थी असतील तर 18,235 पोस्ट ग्रॅज्युएट्स असतील. तर अभियांत्रिकीचे पोस्ट ग्रॅज्युएट्स अंदाजे 2916 विद्यार्थी असतील.