SPPU Exams 2021: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा 11 एप्रिल पासून; 25 मार्चला जाहीर होणार सविस्तर वेळापत्रक
विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाचं सविस्तर वेळापत्रक 25 मार्च दिवशी जाहीर केले जाणार आहे.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने (SPPU) आता प्रथम सत्राच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सद्ध्या प्रथम सत्राच्या परीक्षेच्या तारखेवरून पालक-विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. आता तो काहीसा दूर झाला आहे. सध्या विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा या 11 एप्रिल 2021 पासून घेण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाचं सविस्तर वेळापत्रक 25 मार्च दिवशी जाहीर केले जाणार आहे.
पुणे विद्यापीठ 15 मार्च पासून प्रथम सत्राची परीक्षा घेणार होते. परीक्षेच्या कामासाठी काही एजंसी निवडण्यावरून मतभेद होते. त्याचा फटका परीक्षेच्या वेळापत्रकाला बसला आहे. परीक्षा मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आता परीक्षा नव्या वेळापत्रकानुसार, 11 एप्रिल 2021 पासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. यावर्षी विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. नक्की वाचा: SPPU Exam 2021 Pattern: यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सार्या सत्राच्या परीक्षा यंदा Online, MCQ स्वरूपामध्ये होणार.
पुणे विद्यापीठात झालेल्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत यंदाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्याक्रमांच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षा ऑनलाईन असाव्यात असा आग्रह होता. त्यानुसार अंतिम वर्ष वगळता इतर सार्या वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन होतील. अंतिम वर्षाची परीक्षा मात्र 50 गुण एमसीक्यू आणि 20 मार्कांचे सब्जेक्टिव्ह अशी एकूण 70 गुणांची होईल.
पुणे विद्यापीठामध्ये या ऑनलाईन परिक्षांमध्ये गैर व्यवहार रोखण्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धती वापरली जाणार आहे. त्यामध्ये कॅमेर्याच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणते गैर प्रकार तर होत नाहीत ना? याची देखील चाचपणी केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन परिक्षेदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास 5 संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात पण त्यानंतर देखील संबंधोत विद्यार्थ्यामध्ये सुधार न दिसल्यास कॉपी प्रकाराच्या कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे