SECR Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अधिक
साउथ सेंट्रल रेल्वेने अप्रेंटिसच्या पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. SECR एकूण 399 पदांवर उमेदवार निवडणार आहेत.
SECR Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. साउथ सेंट्रल रेल्वेने अप्रेंटिसच्या पदावर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. SECR एकूण 399 पदांवर उमेदवार निवडणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in येथे भेट द्यावी. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, 5 ऑक्टोंबर 2021 पर्यंत किंवा त्याआधी apprenticeship.org येथे या पदांवर अर्ज करु शकतात. अखेरच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही आहे.
SECR कडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, वेल्डर, कारपेंटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, स्टेनो, प्लंबर, वायरमॅन, पेंटर, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, मॅकेनिक डिजलसह अन्य पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. या पदांवर अर्ज करण्याऱ्या उमेदवारांना 10 वी मध्ये 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आयटीआयचे प्रमाण पत्र सुद्धा असावे.
उमेदवाराचे वय 15-24 वर्ष दरम्यान असावे. तसेच अर्ज भरण्यापूर्वी नोटिफिकेशन नीट वाचावी. त्यानंतर अर्ज करावा असे आवाहन उमेदवारांना करण्यात आले आहे. कारण अर्जात कोणतीही चूक झाल्यास तो स्विकारला जाणार नाही आहे.(Income Tax Department Recruitment 2021: आयकर विभागात 28 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, 'असा' करा अर्ज)
अप्रेंटिस पदाच्या उमेदवारांची निवड ही मेरियच्या गुणांवरुन केली जाणार आहे. या परिक्षेसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्याचसोबत पश्चिम रेल्वेच्या रेल्वे रेक्रूटमेंटने ग्रुप सी पदासाठी नोकर भरती काढली आहे. स्पोर्ट्स कोट्यातून ग्रुप सी च्या विविध पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 21 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.