SBI Job Opportunity: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, करा आजचं अर्ज
या भरती दरम्यान एकूण 714 जागांसाठी पदभरती केल्या जाणार आहे.
देशात दिवसेनदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. पदवीधर (Graduation) शिक्षण घेवून देखील अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. हल्ली सगळ्याचं क्षेत्रात नोकरीसाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे.तरी नोकरीसाठी अर्ज (Application For Job) करणाऱ्यांची संख्या ही रिक्त जागांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी बॅंकींच्या (Bank) परिक्षा देताना दिसतात पण त्यातही निवड होणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank Of India) कडून एसबीआय एस ओ (SBI SO) या पदांसाठी पदभरतीची (Recruitment) घोषणा करण्यात आली आहे. या भरती दरम्यान एकूण 714 जागांसाठी पदभरती केल्या जाणार आहे.तरी भरतीच्या (Recruitment) अर्जप्रक्रीयेसाठी (Application Procedure) कालपासून म्हणजे 31 ऑगस्ट (August) पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
भरतीबाबत सविस्तर माहिती https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर विस्तारित रुपात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager), डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager), सीनियर स्पेशलिस्ट एक्झिक्युटिव्ह (Senior Specialist Executive), मॅनेजर (Manager), सेंट्रल ऑपरेशन टीम (Central Operation Team), प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (Project Development Manager), रिलेशनशिप मॅनेजर (Relationship Manager) , इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (Investment Officer), सीनियर रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager), रिलेशनशिप मॅनेजर(Relationship Manager), रिजनल हेड (Regional Head), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह (Customer Relationship Executive), मॅनेजर (Manager) आणि सिस्टम ऑफिसर (System Officer) अशा विविध जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- UPSC Job Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत होणार भरती)
संबंधीत पदभरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 असुन परिक्षा 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. तर 1 ऑक्टोबर (October) रोजी परिक्षेच वेळापत्रक (Time Table) जारी करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा अशी घोषणा स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून (State Bank Of India) करण्यात आली आहे.