UPSC Job Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत होणार भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
हल्ली मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. तसेच खासगी क्षेत्रात नोकरीसाठी (Private Jobs) मोठी स्पर्धा आहे शिवाय त्या नोकरीची लांब कालवधीची हमी देखील कमी असते. म्हणून सरकारी नोकरी (Government Jobs) मिळालेली सर्वोत्तम. पण सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी हवी असल्यास त्यासाठी विशेष प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात पण आता सरकारी कार्यालयात नोकरीची संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (Union Public Service Commission) विविध पदांची भरती केल्या जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Website Notification) प्रसिद्ध करण्यात आले. तरी यासाठी नोंदणी प्रक्रीया (Registration), शैक्षणिक पात्रता (Educational Qualification), पगार (Payment) किती असेल हे जाणून घेवूया.
पुनर्वसन अधिकारी आणि इतर पदांसाठी (UPSC Recruitment 2022) केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना UPSC च्या अधिकृत वेबसाइट (Website), upsc.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. 15 सप्टेंबर 2022 ही अर्ज (Registration) करण्याची शेवटची तारीख आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Degree Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), जातीचा दाखला (Cast Certificate), ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो (Passpost Photo) हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. (हे ही वाचा:- BPCL Recruitment: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पदवीधर शिकाऊ पदांसाठी भरती, करा आजचं अर्ज)
केंद्रीय लोकसेवा आयोगा अंतर्गत एकूण 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत.अर्ज करण्यासाठी उमेदवारांना केवळ 20 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तरी एससी(SC),एसटी(ST),पीडब्ल्यूबीडी (PWD)महिला उमेदवारांकडून (Female Candidate) कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पदभरतीअंतर्गत मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologist)चे 1 पद, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer)ची 4 पदे, शास्त्रज्ञ 'बी' (Scientist 'B')ची 7 पदे, पुनर्वसन अधिकारी (Rehabilitation Officer)ची 4 पदे, उपमहासंचालक/प्रादेशिक संचालक (Deputy Director General / Regional Director)ची 3 पदे भरली जाणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2022 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

