SBI Job Recruitment: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती दरम्यान एकूण 1673 जागांसाठी पदभरती केल्या जाणार आहे.
देशात दिवसेनदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. पदवीधर (Graduation) शिक्षण घेवून देखील अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. हल्ली सगळ्याचं क्षेत्रात नोकरीसाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे.तरी नोकरीसाठी अर्ज (Application For Job) करणाऱ्यांची संख्या ही रिक्त जागांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी बॅंकींच्या (Bank) परिक्षा देताना दिसतात पण त्यातही निवड होणाऱ्यांची संख्या अगदी तुरळक. स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank Of India) कडून प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO) या पदांसाठी पदभरतीची (Recruitment) घोषणा करण्यात आली आहे. या भरती दरम्यान एकूण 1673 जागांसाठी पदभरती केल्या जाणार आहे. तरी भरतीच्या (Recruitment) अर्जप्रक्रीयेसाठी (Application Procedure) 22 सप्टेंबर 2022 पासून सुरुवात झालेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
भरतीबाबत सविस्तर माहिती https://sbi.co.in/ या संकेतस्थळावर विस्तारित रुपात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत हजारोंच्या संख्येने नवीन उमेदवारांना संधी मिळत असल्याने या भरतीस एसबीआयची मेगाभरती समजल्या जात आहे. 12 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. (हे ही वाचा:- UPSC कडून Combined Defence Services Examination 2 परिक्षेचा निकाल जाहीर, https://www.upsc.gov.in/ या धिकृत संकेतस्थळावर पहा तुमचा निकाल)
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Degree Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), जातीचा दाखला (Cast Certificate), आधारकार्ड (Aadhar Card), आणि पासपोर्ट साईझ फोटो (Passport Photo) हे कागदपत्र जोडणे अनिवार्य असेल. संबंधीत पदभरतीची मुख्य परीक्षा 2023 च्या पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. मार्च 2023 पर्यंत निकाल जाहीर होईल. तसेच पीओ (PO) पदाचा अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)