Sarkari Naukari 2021: महाराष्ट्रासह 'या' 17 राज्यांमध्ये शिक्षक पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया
त्यानुसार एकलव्य मॉडेल आवासीय शाळा (EMRS) मध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT शिक्षक आणि TGT शिक्षक पदासाठी नोकर भरती करण्यासाठी अर्ज मागविले आहेत.
Sarkari Naukri 2021: आदिवासी कार्य मंत्रालयाकडून देशभरातील 17 राज्यांमध्ये 3479 पदांसाठी नोकर भरतीसाठीची एक नोटीस जाहीर केली आहे. त्यानुसार एकलव्य मॉडेल आवासीय शाळा (EMRS) मध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, PGT शिक्षक आणि TGT शिक्षक पदासाठी नोकर भरती करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे योग्य आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना 1 एप्रिल 2021 पासून या नोकर भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. याकरिता उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट tribal.nic.in वर जाऊन अर्ज करावा. या भरती परीक्षेचे आयोजन NTA कडून करण्यात येणार आहे.
तर शिक्षक भरतीच्या नोटीसीनुसार तुम्हाला काही नियम आणि अटी सुद्धा लागू असणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी त्याबद्दल नीट वाचून घ्या. तर येथे जाणून घ्या EMRS Techer Notification 2021 साठीच्या महत्वपूर्ण तारखा (Bank Merger: देशातील 10 बँकांचे एकत्रिकरण झाल्याने सामान्य माणसावर त्याचा कसा होईल परिणाम? जाणून घ्या सविस्तर)
>ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 1 एप्रिल 2021
>ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 30 एप्रिल 2021
>अर्जाचे शुल्क भरण्याची अखेरची तारीख-30 एप्रिल 2021
>परीक्षेची तारखी- जून महिन्यातील पहिला आठवडा
>>तर कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत ते जाणून घ्या
>मुख्याध्यापक- 175 पद
>उपमुख्याध्यापक- 116 पद
>पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक- 1244 पद
>ट्रेंड ग्रॅज्युएट शिक्षक-1944 पद
वरील महत्वाच्या तारखा आणि रिक्त पदांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास प्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तसेच महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, जम्मू-कश्मीर, मध्य प्रदेश, मणीपूर, ओडिशा, मिझोराम, राजस्थान, सिक्किम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे शिक्षक पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून कमीतकमी 50 टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री असणे अनिवार्य आहे. त्याचसोबत बीएड किंवा त्यासंदर्भातील शिक्षण पात्रता डिग्री आणि कंप्युटरवर काम करणे माहिती असले पाहिजे.